Tag: #desha
-
Sinhgad Fort : हिंदवी स्वराज्याचा बुलंद इतिहास सांगणारा सिंहगड (किल्ले कोंडाणा)
Sinhgad Fort | पुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण…
-
Kothaligad : उर्ध्वमूखी भुयारीमार्गाचा – कोथळीगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना सह्याद्रीतील गिरीदुर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे त्यांनी असंख्य गिरीदुर्ग लष्करीदृष्ट्या भक्कम केले होते. हे करताना त्यांनी फक्त आपले लक्ष्य बलाढ्य गिरीदुर्गांवर केंद्रित न करता, छोट्या छोट्या गिरीदुर्गांवरही केंद्रित केले. शिवकालात मोक्याच्या ठिकाणी असलेले गिरीदुर्ग, टेहळणीसाठी उपयोगात आणले जात असत. कोथळीगड Kothaligad हा देखील असाच टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला. दुरून बघितल्यावर…
-
Vishalgad : घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवरील पहारेकरी – विशालगड
इथेच पडिला बांध खिंडिला बाजीप्रभुच्या छातीचा इथेच फुटली छाती , परी ना दिमाख हरला जातीचा। आठवण येता अजुन येतो, खिंडीचा दाटून गळा। विशाळगडाच्या विशाल भाळी, रक्तचंदनी खुले टिळा ।। केशव पंडित आपल्या राजाराम चरितम् काव्यात म्हणतात, विशाळगडी दुर्गही सांप्रत विद्यते तव । अत्रापि दुर्ग सामाग्री परिपुर्णेन भाति मे ।। यावरूनच गडाचे नाव विशाळगड आहे हे…
-
यावश्चंद्रदिवाकरौ महाराष्ट्राला मुंबई Mumbai मिळू देणार नाही ही प्रतिज्ञा करणारा नेता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात साठ वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याबरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई Mumbai महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना करणारे स. का. पाटील यांच्या २४ जून स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या…
-
Shivneri Fort – स्वराज्याची पहाट उगवली तो दुर्ग शिवनेरी
मर्हाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो शिवनेरी. Shivneri Fort हा पुरातन किल्ला. या किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीला मॉसाहेब जिजाऊंनी नवस केला होता की, पुत्र जन्माला आला तर त्यास तुझे नाव देईल. आज किल्ल्यांची माहिती देण्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून करीत आहे. शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा…
-
Kulaba Fort – स्वराज्याची सागरी राजधानी : किल्ले कुलाबा
मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला Kulaba Fort उभा आहे. . एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा,डोंगरांचा वळणावळणाचा,घाटांचा भाग तर दुसरीकडे २४० कि.मी.लांबीचा अथांग अरबी समुद्र अशी भौगोलिक रचना. तीस ते पस्तीस कि.मी.लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला…
-
Rajgad Fort – छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक वास्तव्य लाभलेला – किल्ले राजगड
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक किल्यांपैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला गडांचा राजा राजगड. Rajgad Fort आज एवढ्या वर्षानी फार कमी देखरेखीत असला तरीही भक्कम उभा आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी भेट द्यावा आणि ती दिल्यावर पुन्हा पुन्हा भेट द्यायला लावेल असा हा राजगड. इसवी सन १६४८ ते…
-
Lohgad Fort – इतिहास आणि भूगोलाने नटलेला – बुलंद लोहगड!
लोहगड-विसापूर Lohgad Fort ही एक अजोड दुर्ग जोडगोळी. इतिहास आणि भूगोलाने नटलेली. या गडांवर गेलो, की इंद्रायणी, पवनेचे सारे खोरे नजरेपुढे नाचू लागते. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच…
-
Janjira Fort – अजिंक्य ठरलेला जलदुर्ग – जंजिरा
जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला Janjira Fort राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष…
-
Fort Vikatgad : निसर्गप्रेमींचा आवडता पेबचा किल्ला
माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी ‘पेब’ सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड ‘गोरखगडाशी’ साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे…