Tag: #मराठीनजराणा

  • Shivneri Fort – स्वराज्याची पहाट उगवली तो दुर्ग शिवनेरी

    Shivneri Fort – स्वराज्याची पहाट उगवली तो दुर्ग शिवनेरी

    मर्‍हाठी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो शिवनेरी. Shivneri Fort हा पुरातन किल्ला. या किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीला मॉसाहेब जिजाऊंनी नवस केला होता की, पुत्र जन्माला आला तर त्यास तुझे नाव देईल. आज किल्ल्यांची माहिती देण्याची सुरुवात किल्ले शिवनेरीपासून करीत आहे. शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा…

  • Kulaba Fort – स्वराज्याची सागरी राजधानी : किल्ले कुलाबा

    Kulaba Fort – स्वराज्याची सागरी राजधानी : किल्ले कुलाबा

    मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्हयात अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत कुलाबा किल्ला Kulaba Fort उभा आहे. . एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा,डोंगरांचा वळणावळणाचा,घाटांचा भाग तर दुसरीकडे २४० कि.मी.लांबीचा अथांग अरबी समुद्र अशी भौगोलिक रचना. तीस ते पस्तीस कि.मी.लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. कुलाब्याच्या इतिहासात डोकावले तर हा जलदुर्ग मराठेकालीन बांधकामाची साक्ष देत आजही दिमाखात उभा असलेला…

  • Bhamer Fort – नैसर्गिक कवच लाभलेला भामेर गड

    Bhamer Fort – नैसर्गिक कवच लाभलेला भामेर गड

    धुळे शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर, साक्री शहरापासून 13 किलोमीटरवर भामेरचा किल्ला Bhamer Fort आहे. या किल्ल्यापासून 27 किलोमीटर बळसाणे येथे अंतरावर जैन धर्मीयांचे प्रसिध्द असे तीर्थक्षेत्र आहे. येथेही देशभरातील जैन धर्मीय मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. या मंदिरात भगवान विमलनाथ यांची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. इतिहासगिरीदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 2500 मीटर आहे.…

  • Rajgad Fort – छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक वास्तव्य लाभलेला – किल्ले राजगड

    Rajgad Fort – छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक वास्तव्य लाभलेला – किल्ले राजगड

    ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक किल्यांपैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला गडांचा राजा राजगड. Rajgad Fort आज एवढ्या वर्षानी फार कमी देखरेखीत असला तरीही भक्कम उभा आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी भेट द्यावा आणि ती दिल्यावर पुन्हा पुन्हा भेट द्यायला लावेल असा हा राजगड. इसवी सन १६४८ ते…

  • Lohgad Fort – इतिहास आणि भूगोलाने नटलेला – बुलंद लोहगड!

    Lohgad Fort – इतिहास आणि भूगोलाने नटलेला – बुलंद लोहगड!

    लोहगड-विसापूर Lohgad Fort ही एक अजोड दुर्ग जोडगोळी. इतिहास आणि भूगोलाने नटलेली. या गडांवर गेलो, की इंद्रायणी, पवनेचे सारे खोरे नजरेपुढे नाचू लागते. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे.त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच…

  • Janjira Fort – अजिंक्य ठरलेला जलदुर्ग – जंजिरा

    Janjira Fort – अजिंक्य ठरलेला जलदुर्ग – जंजिरा

    जंजीरा चा अर्थच मुळी समुद्राने वेढलेला किल्ला, तसा जंजीरा आपल्या स्वराज्या साठी अजेय राहिला. मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला Janjira Fort राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. भक्कम बांधकाम आणि समुद्र या शिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या ५७२ तोफा ह्या मुळेच जंजिरा अभेद्य होता. या तोफां मध्ये विशेष…

  • Fort Vikatgad : निसर्गप्रेमींचा आवडता पेबचा किल्ला

    Fort Vikatgad : निसर्गप्रेमींचा आवडता पेबचा किल्ला

    माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी ‘पेब’ सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड ‘गोरखगडाशी’ साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे…

  • Fort Vijaydurg : आश्‍चर्यकारक वास्तूकलेने नटलेला विजयदुर्ग

    Fort Vijaydurg : आश्‍चर्यकारक वास्तूकलेने नटलेला विजयदुर्ग

    विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1193 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग Fort Vijaydurg किल्ल्याचा समावेश आहे.…

  • Virgad Fort मराठी आरमारासाठी पायाभूत ठरणारा – वीरगड

    Virgad Fort मराठी आरमारासाठी पायाभूत ठरणारा – वीरगड

    घोसाळगड उर्फ विरगड Virgad Fort हा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर रेवदंडा व साळवे ह्या दोन खाड्यांच्यामधे चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांनी वेढलेला असुन मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर व पायथ्यापासून साधारण २०० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. पायथ्याशी घोसाळे नावाचे गाव आहे ज्यावरून ह्याला घोसाळगड हे नाव पडले. उत्तर…

  • Birwadi fort : इतिहासातही दुर्लक्षित झालेला बिरवाडीचा किल्ला

    Birwadi fort : इतिहासातही दुर्लक्षित झालेला बिरवाडीचा किल्ला

    रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला Birwadi fort रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे. इ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर शिवाजी राजांनी १६५८च्या सुमारास बिरवाडीचा किल्ला Birwadi fort बांधला. समुद्रसपाटीपासून २३४ मीटर उंच असलेला हा किल्ला पायथ्यापासून…