दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात आपल्या आगळ्या शैलीने आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर sunil grover आज त्याच्या खऱ्या नावापेक्षाही त्याच्या भूमिकांमुळे लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. आज दि. ३ ऑगस्ट अभिनेता सुनिल गोव्हरचा जन्मदिवस.
बालपण
कपिल शर्माच्या शोमधून डॉ.गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे प्रसिध्द झालेल्या सुनिल गोव्हरने sunil grover थिएटर, रेडिओ, टीव्ही तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या मेहनत व टायमिंगच्या जोरावर कॉमेडी जगतात सुनिल गोव्हर एक प्रसिद्ध नाव बनले आहे. ९ ऑगस्ट १९७७ ला हरियाणातील डबवाली गावात हिंदू पंजाबी परिवारात जन्मलेल्या सुनिलने आपल्या प्राथमिक शिक्षण आर्य विद्या मंदिर डबवाली येथून पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गुरुनानक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉमर्समध्ये पदवी संपादन केल्यानंतर पंजाब युनिर्व्हसिटी चंदीगढ येथून त्याने थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
जसपाल भट्टींशी ओळख
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुनिल चंदीगढ येथेच थिएटरमध्ये अभिनय करत होता. येथेच त्यांची ओळख जसपाल भट्टी यांच्याशी झाली. त्यांच्यासोबत काम करताना दूरचित्रवाहिन्यांचा मार्ग सुनिलकरता खुला झाला. जसपाल भट्टी यांच्यासोबतच पंजाबी मालिका प्रोफेसर मनी प्लांट केल्यानंतर सब टीव्हीवरील लो कर लो बात ही मालिका त्याला मिळाली. त्यानंतर फिल्मी टीव्हीवरील क्या आप पाचवी फेल चम्पू है? हा टीव्ही शो मिळाला. टीव्हीसोबतच सुनिलने रेडियोवरदेखल काम केले आहे. रेडिओ मिर्चीवरील त्याचा शो हंसी के फवारे प्रसिध्द झाला होता. सब टीव्हीवरील मूक मालिका गुटूर घू मध्ये अभिनय करत सुनिल प्रेक्षकांना सामोरा गेला. या मालिकेचे २६ भाग प्रसारित झाल्यानंतर ही मालिका बंद झाली. प्रेक्षकात लोकप्रिय होत सुनिलचे sunil grover मार्गक्रमण सुरु होते. यानंतर त्याने टीव्हीवरील कौन बनेगा चम्पू आणि चला लल्लन हिरो बनने केले.
कॉमेडी नाईट विथ कपिल
यानंतर स्टार टीव्हीवरील मेड इन इंडिया आणि सोनी टीव्हीवरील कॉमेडी नाईट विथ कपिल या शो ने सुनिलला देशभरात प्रसिध्दी मिळवून दिली. कपिल शर्मा शोच्या यशात अभिनय क्षमतेच्या जोरावर सुनिलने सिंहाचा वाटा उचलला.
टीव्हीवरील यशानंतर हिंदी चित्रपटसृष्टीनेही सुनिलला बोलावले. यात १९९८ मध्ये अजय देवगण आणि काजल यांच्यासोबतच्या प्यार तो होना ही था या चित्रपटात सुनिल न्हाव्याच्या भूमिकेत होता. २००२ मध्ये द लिजेंड ऑफ भगतसिंह यात जयदेव कपूरची भूमिका. २००५ मधील इन्सान चित्रपटातील महेश, २००८ मधील गजनी चित्रपटातील संपत, जिला गाझियाबादमधील फकीरा, हिरोपंती मधील ड्रायव्हर, गब्बर इज बॅक मधील कॉन्स्टेबल साधुराम, बैसाखी लिस्टमधील तरसेमलाल, बागी मधील पी.पी. खुराना, कॉफी विथ डी मधील अर्नबची भूमिका सुनिलने साकारली आहे.
कपिल शर्माशी वाद
मानधनावरून कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर सुनिल गोव्हरने कपिलचा शो सोडला आणि मनीष पॉलसोबत मेड इन इंडिया हा शो सुरु केला. पण टीआरपी न मिळाल्याने हा शो बंद करावा लागला. दरम्यान कपिल शर्मा सोबतचा वाद मिटल्याने सुनिल पुन्हा या शो मध्ये आला. मात्र पुन्हा २०१७ मध्ये कपिल शर्माने मेलबर्नला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये नशेत शिवीगाळ केल्याने पुन्हा कपिल व सुनिल यांच्यात वाद सुरु झाला होता.
वैयक्तिक जीवना सुनिलने इंटेरियर डिझायनर आरतीशी विवाह केला असून, त्यांना २००८ मध्ये जन्मलेला मोहन हा मुलगा आहे. सुनिलला २०१४ मध्ये स्टार परिवाराचा लोकप्रिय सूत्रसंचालनाचा पुरस्कार मिळाला असून, फिल्मी चॅनलचा तो ब्रॅण्ड अम्बेसेडर आहे.
Leave a Reply