१३ सप्टेंबर २०२३ रोजी, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून मिळाली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शोध घेतल्यानंतर, घनदाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी गावाच्या उंच भागात लपून बसल्याचे सैन्याला आढळले. कर्नल मनप्रीत तपास पथकाचे नेतृत्व करत होते. यावेळी कर्नल मनप्रीत सिंग १९ RR शोध पथकाचे नेतृत्व करत होते. या कारवाईत कोकरनाग कंपनी कमांडर मेजर आशिष धोनचक त्यांच्यासोबत होते. शोध मोहिमेत पुढे जत असतांना बुधवारी दुपारच्या सुमारास लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर धोनचक, डीएसपी भट आणि शिपाई परदीप सिंग Sepoy Pardeep Singh यांना गोळी लागली.
वैयक्तिक जीवन
वयाच्या २७ व्या वर्षी शहीद झालेले शिपाई परदीप सिंग हे पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील सामना तहसीलमधील बलमगढ गावचे रहिवासी होते आणि त्यांचा जन्म २० एप्रिल १९९६ त्यांचा रोजी झाला होता. वडील दर्शन सिंग व मोठा भाऊ कुलदीप सिंग यांनी लहान असताना परदीप यांच्या मनात सशस्त्र दलात सेवा करण्याची कल्पना रुजवली. आठवीत असतांनाच परदीपच्या मनात सैन्यात सामील होण्याच्या उर्मीने उचल खाल्ली आणि त्यादृष्टीने प्रयत्न करीत वयाच्या १९ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करुन डिसेंबर २०१५ मध्ये ते सैन्यात भरती झाले. गेल्याच वर्षी २०२२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांचा सीमा राणी यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतरची सुट्टी संपल्यावर त्यांना जम्मू काश्मीरातील 19 RR बटालियनमध्ये सेवा देण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.
२०२३ मध्ये मिळालेली जबाबदारी
सप्टेंबर २०२३ दरम्यान परदीप सिंग Sepoy Pardeep Singh यांची १९ आरआर बटालियन जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बंडखोरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आली होती. युनिटचे जबाबदारीचे क्षेत्र बंडखोरी प्रवण क्षेत्र असल्याने, सातत्याने दक्ष राहणे हा त्यांच्या सेवेचा भाग होता.
म्हणूनच १३ सप्टेंबर २०२३ ला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात काही कट्टर दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून माहिती मिळाली. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर स्त्रोतांकडून मिळाली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शोध घेतल्यानंतर, घनदाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी गावाच्या उंच भागात लपून बसल्याचे सैन्याला आढळले.
जखमी झाल्यानंतर होते बेपत्ता
त्यानुसार, १२ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री १९ आर आर बटालियन आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहाय्याने संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले. १९ आरआरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या टीममध्ये शिपाई परदीप सिंग Sepoy Pardeep Singh यांचा समावेश होता. नियोजनानुसार संयुक्त पथक संशयित भागात पोहोचले आणि त्यांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी धोका ओळखून पळून जाण्याच्या प्रयत्नात जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या गोळीबारादरम्यान, परदीप सिंग यांच्यासह मेजर आशिष धोनचक आणि कर्नल मनप्रीत सिंग १९ आरआर आणि जम्मू -काश्मीर पोलिस पथकाचे डीएसपी हुमायून भट्ट यांना गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. चकमक घनदाट जंगलात सुरु असल्याने मेजर आशिष धोनचक, कर्नल मनप्रीत सिंग आणि जम्मू -काश्मीर पोलिस पथकाचे डीएसपी हुमायून भट्ट बचाव पथकाला सापडले. त्यांना तात्काळ चकमक क्षेत्राच्याबाहेर काढण्यात येऊन वैद्यकीय उपचारांसाठी श्रीनगरला नेण्यात आले. मात्र घनदाट जंगल व सातत्याने सुरु असलेल्या गोळीबारात जखमी परदीप सिंग Sepoy Pardeep Singh बचाव पथकाला सापडले नाहीत. मोठ्या शोधानंतर पाच दिवसांनंतर परदीप सिंगचा यांचा मृतदेह सापडला.
परदीप सिंग हे एक शूर आणि समर्पित सैनिक होते, वयाच्या २७ व्या वर्षी दहशतवाद्यांशी लढतांना त्यांनी देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण केले. परदीप सिंग यांच्या पश्चात त्यांचे वडील दर्शन सिंग, पत्नी श्रीमती सीमा राणी, भाऊ कुलदीप सिंग असा परिवार आहे.
Leave a Reply