mario-puzo

Godfather नावाचं गारुड जन्माला घालणारे लेखक मारिओ पुझो

चित्रपट कोणत्याही भाषेतील असो. त्यातील कहाणी जशी समाजातल्या अतिशय सज्जन, सभ्य माणसाची असते तशीच ती समाजात दुर्जन समजल्या जाणाऱ्या माणसाची ही असते आणि अशा सरळ सज्जन कहाण्यापेक्षा नियतीने केलेले अटळ वार झेलत जी दुर्जन माणसाची कहाणी बनते ती कायम लोकप्रिय राहते. अशीच कहाणी होती GODFATHER ची! Godfather नावाच गारुड जनमाणसात अवतरून अनेक वर्षे उलटली. 1969 साली प्रथम इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली ही कादंबरी.

Godfather ला कल्पनेतून प्रत्यक्षात जिवंत केलं आणि ठेवलं ते या कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांनी १९७२ साली आलेल्या त्याच्यावरच्या चित्रपटाने. सर्वाधिक गल्ला खेचलेला.तीन ऑस्कर वर आपली मोहर कोरलेला ज्यात पुझो ला best adaptive screenplay साठी ऑस्कर मिळालं होत. गँगस्टरवर जेव्हढे म्हणून काही सिनेमे बनवले गेले आहेतत्याच्या कॅटेगरी मधलाहा सगळ्यात संस्मरणीय ठरलेला. इतका की त्याची अमेरिकेच्या Library of congress च्या National film registry मध्ये जतन करून ठेवलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलात्मक दृष्ट्या उत्तम मानल्या गेलेल्या फिल्म मध्ये निवड झाली.

जशी मुंबई ची “धारावी” त्याचप्रमाणे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील “हेल्स किचन” या नावाने धारावीपेक्षा बदनाम असणारा इलाका. त्या इलाक्यात गरीब इटालियन आई वडिलांच्या पोटी १५ ऑक्टोबर १९२० जन्मलेला मरिओपुझो. जरी आजूबाजूचे वातावरण गुन्हेगारीकड झुकवणारे असले तरी त्याकडे न वळता त्याने चांगले शिक्षण घेवून अगोदर मिलिटरी आणि नंतर पत्रकारिता आणि शेवटी लेखक म्हणून आपले नशीब अजमावून पाहिले. पुझो ची Godfather पूर्वीची दोन पुस्तके सपशेल अपयशी ठरली होती.घरात बायको आणि पाच मुले यांना स्वत:च्या क्लर्क च्या नोकरीमधून आपण काहीही देवू शकणार नाही त्यासाठी काहीतरी अस लिहायला हव जे लोकांच्या काळजाचा ठाव घेईल या एकाअसहाय आणि जळत्या जाणीवेतून त्याने आपली तिसरी कादंबरी लिहायला घेतली पणया ही कादंबरीला कोणी प्रकाशक मिळेना. ती छापायला कोणी तयार होईना. शेवटी न्यूयॉर्क च्या G. P. Putnam’s Sons यांनी ती कादंबरी छापायचे ठरवले.

 

दुय्यम दर्जाच्या मासिकासाठी पत्रकारिता करीत असतानाच्या काळात त्याने अमेरिकेतील माफिया डॉन आणि माफिया कुटुंबाच्या बऱ्याच हकीकती ऐकल्या होत्या.त्याच कथांचा धागा पकडून Godfather लिहिली गेली. प्रकाशनाआधी जिची संभावना एक छचोर झोपडपट्टी च्या पोराने लिहिलेली एक टुकार गुन्हेगारी कथा अशी केली जात होती तिने प्रकाशना नंतर सगळ्या उच्चभ्रू एलाईट क्लास कादंबऱ्या ना मागे टाकले. न्युयॉर्क टाईम बेस्ट सेलर म्हणून तब्बल ६७ महिने Godfather प्रथम स्थानावर राहिली. प्रकाशात आल्यापासून कादंबरीच्या केवळ दोन वर्षात विक्रमी ९० लाख प्रती विकल्या गेल्या. आजहीबेस्ट सेलिंग च्या यादीत Godfather चा नंबर वरती लागतो. सर्वसाधारणपणे सूडनाट्य हा कुठल्याही बेस्ट सेलर कादंबरीच्या यशाचा गाभा राहिलेला आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध तरीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी कॉर्लीऑन फॅमिली आणि तिचा कुटुंब प्रमुख डॉन व्हिटो कॉर्लीऑन आणि त्याची वारसदार मुले यांच्या भोवती असलेलं कादंबरीचं कथानक.

डॉन व्हिटो कॉर्लीऑन ने अंमली पदार्थाच्या विक्रीस सरंक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर खुनी हल्ला होतो. त्याच्या गैरहजेरीत गोष्टी सुरळीत सुरु ठेवण्याची जबाबदारी डॉनचा कारभार सांभाळणारे त्याचे दोन सेनापती क्लेमेंझो आणि टेशिओ, डॉनचा भडक डोक्याचा थोरला मुलगा सांतिनो कॉर्लीऑन, डॉन ने अनाथ म्हणून सांभाळ केलेला आणि नंतर फॅमिली चा प्रमुख सल्लागार झालेला वकील टॉम हेगन, प्रचंड घाबरट असा डॉन चा मधला मुलगा फ्रेडी आणि वडिलांचे कधीही न ऐकणारा त्यांच्या मर्जीविरुद्ध वागणारा आणि फॅमिली च्या बिझनेस पासून पूर्णपणे अलिप्त राहणारा धाकटा मुलगा मायकल यांच्यावर येवून पडते.मात्र घटना अशा काही वळण घेतात ज्यामध्ये फॅमिली च्या बिझनेस पासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या मायकलला खून केल्या प्रकरणी इटली मध्ये जावून तोंड लपवावे लागते, सांतीनो प्राणास मुकतो आणि प्राणघातक हल्ल्यामधून वाचलेल्या डॉनला स्वत: परत सूत्रे हातात घेवून सर्व माफिया फॅमिलीची बैठक बोलावून त्याच्यात स्वत:चा पराभव मान्य करावा लागतो. वय झाल्यामुळे आपल्या साम्राज्याच्या भावी वारसदाराला तयार करून स्वत:ची नेस्तनाबूत झालेली सत्ता परत मिळवण्यासाठी डॉन कॉर्लीऑनज्या हुशारीने आणि संयमाने चक्रे फिरवतो त्याचा शेवट काय होतो हे मुळापासून वाचण्यासारखे आहे. शिवाय कादंबरीच्या ओघात अनेक पात्रे आणि त्यांची उपकथानके स्वतंत्रपणे भेटीस येत राहतात. पण त्यांची मूळ कादंबरीच्या प्लॉट बरोबर कुठेही नाळ तुटत नाही.

या कादंबरी मध्ये सकारात्मक मानवी भाव भावना, मुल्ये यांना फारस स्थान नाही. सगळे माफिया, त्यांच्या रक्तरंजित महत्वाकांक्षा, किडे मुंग्या सारखी मरणारी माणसे, लैंगिक शोषण यांनी पानेच्या पाने भरली आहेत तरीही Godfather इतकी यशस्वी का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर अस लक्षात येईल की डॉन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. डॉन कॉर्लीऑनची व्यक्तीरेखा तत्वनिष्ठ माफिया ची आहे.Godfather मधील पात्रे आपल्याला आपल्या आयुष्यात जागोजागी भेटतील आणि खऱ्या आयुष्यातले अटळ नियतीचे वार सहन करताना त्याच्याविरुद्ध लढताना कदाचित स्वत:मध्ये हा डॉन व्हिटो कॉर्लीऑन, मायकल कॉर्लीऑन,एकदा तरी डोकावून पाहताना ही नक्की दिसेल.जोपर्यंत देशोदेशीच्या उभारलेल्या समाजमान्य सिस्टीम मध्ये सर्वाना समान न्याय मिळत नाही त्या दिवसा पर्यंत कॉर्लीऑन साम्राज्याची ही कहाणी पुढची अनेक वर्षे वाचली जाणार यात शंका नाही!