हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. ५५ मीटर उंचीवर बांधलेले हे मंदिर कलिंग आणि ओरिया शैलीत बांधण्यात आले आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथील प्रसिद्ध लिंगराज मंदिराबद्दल. Lingraj Temple भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या लिंगराज मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिरात भगवान शिवासोबत विष्णूचीही पूजा केली जाते.
या मंदिराच्या बांधकामाचा आरंभ ललाट इंदू केसरी यांनी केली होता. त्यांची इसवी सन ६१५ ते ६५७ पर्यंत या जागेवर राज्य केलं होतं. आजूबाजूच्या परिसरातील मंदिरांचे बांधकाम सोमवंशी राजा ययाति केसरी याने अकराव्या शतकात केलं. हा राजा सोमवंशी असून याने आपली राजधानी जजापूर ही भुवनेश्वरमध्ये स्थलांतर करून घेतली. या स्थानाचं वर्णन ब्रह्मपुराणात एकाम्र क्षेत्र म्हणून केला गेला आहे. तर या जागेचे काही भाग चौदाशे वर्ष जुने आहेत. Lingraj Temple
लिंगराज मंदिराविषयी अशी धारणा आहे की त्यांच्या नावावरून भुवनेश्वर शहराचे नाव पडले आहे. वास्तविक भगवान शिवाच्या पत्नीला येथे भुवनेश्वरी म्हणतात. दुसरीकडे, लिंगराज म्हणजे लिंगाचा राजा, ज्याला येथे भगवान शिव म्हणतात. या मंदिरात पूर्वी कीर्तिवासाच्या रूपात शिवाची पूजा केली जात होती, नंतर हरिहराच्या रूपात. भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिर Lingraj Temple हे शहराचे प्रमुख स्थान आहे.
लिंगराज मंदिर हे भारतातील अशा मंदिरांपैकी एक आहे ज्यात उत्कृष्ट वास्तुकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे १० व्या आणि ११ व्या शतकात बांधले गेले होते. हे मंदिर सोमवंशी राजा जजती केसरी याने बांधले होते. त्याचबरोबर मंदिराची उंची ५५ मीटर असून त्यावर अतिशय नेत्रदीपक कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिर कलिंग आणि ओरिया शैलीत बांधले आहे. ते तयार करण्यासाठी वाळूचा दगड वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या वरच्या बाजूला उलटी घंटा आणि कलश बसवण्यात आले आहेत, जे लोकांना आश्चर्यकारक वाटतात. त्याच वेळी, त्याचा वरचा भाग पिरॅमिडच्या आकारात ठेवला जातो. इतर हिंदू मंदिरांच्या तुलनेत लिंगराजा काही कठोर परंपरांचे पालन करतो. यामुळेच या मंदिरात गैर-हिंदू लोकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, या मंदिराशेजारी एक व्यासपीठ बांधण्यात आले आहे जेणेकरून इतर धर्माच्या लोकांनाही ते सहज पाहता येईल.
या मंदिराचे मुख्य द्वार पूर्वेच्या दिशेस आहे. बाकीचे दरवाजे उत्तर आणि दक्षिण दिशेस आहेत. वर्षभर मंदिरात पर्यटक आणि श्रध्दाळू भक्तांची गर्दी सुरुच असते. स्थापत्य कलेच्या दृष्टीतून लिंगराज मंदिर व जगन्नाथपुरी मंदिर आणि कोणार्क मंदिर हे जवळपास एकाच स्थापत्य शैलीचे उदाहरण दिसुन येतात. बाहेरून बघताच मंदिराच्या चारी बाजूने फुलांचे गजर घातलेले दिसून येतात.मंदिराचे चार भागांमध्ये विभाजन झाले आहे. एक म्हणजे मुख्य मंदिर आणि त्याच्याशिवाय यज्ञशाळा, भोगमंडप आणि नाट्यशाळा. भगवान शिव यांना समर्पित असलेलं हे कलिंग वास्तुशैली आणि ओरीसा शैलीचे उत्तम उदाहरण आहे. गर्भगृहा शिवाय भोगमंडपात सिंह आणि देवी-देवता यांच्या कलात्मक प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत.
लिंगराज मंदिर हे शिवमंदिर असून येथे महाशिवरात्रीला शिवभक्तांचा कल्लोळ असतो. शिवरात्री खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. लाखो ऊन श्रद्धाळू लोक दरवर्षी भेट देतात. महाशिवरात्रीचा मुख्य उत्सव रात्री पार पडतो. जेव्हा भक्तजन लिंगराज मंदिराच्या शिखरावर पोहचून महादीप प्रज्वलित करतात व आपला व्रत खोलतात. याच्यानंतर चंदन समारोह म्हणजे चंदन यात्रा हा उत्सव देखील खूप मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. चंदन समारोह हा उत्सव जवळपास २२ दिवस चालू असतो. या वरुन मंदिराची महिमा किती मोठी आहे याचा अंदाज येतो. दररोज या मंदिरात लिंगराजाच्या दर्शनासाठी सहा हजार भक्त भेट देतात. तर शिवरात्रीच्या वेळेस ही संख्या दोन लाखांहून अधिक असते. दरवर्षी मे महिन्यात इथे रथयात्रा आयोजित केली जाते.
लिंगराज मंदिर सर्वात मोठं व प्राचीन काळापासून सुरू असलेलं मंदिर आहे. हे मंदिर भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर इथे आहे. लिंगराज मंदिराला भेट देण्यासाठी आपण तिन्ही मार्गांचा उपयोग करू शकतो. लिंगराज मंदिराला पोहचण्यासाठी भुवनेश्वर एअरपोर्ट हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. एअरपोर्ट पासून मंदिर ३.७ किलोमीटर दूर आहे. हे एअरपोर्ट भारतातील सगळ्या मुख्य शहरांना जोडलेले आहे. त्यासोबतच बस आणि ट्रेन सेवासुद्धा आहेत. मंदीराला भेट देण्याची वेळ सकाळी पाच ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असते.
Leave a Reply