Category: शास्त्रज्ञ – शोध
-
भारताचे एडिसन : वैज्ञानिक डॉ. शंकर आबाजी भिसे Shankar Abaji Bhise
आज ७ एप्रिल भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक डॉ शंकर आबाजी भिसे Shankar Abaji Bhise यांचा स्मृतिदिन.दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे पेटंट घेणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या,तिरस्कार व्यक्त करणार्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणार्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. ’आयुष्यात…
-
केलॉग कॉर्नफ्लेक्स कंपनीचा संस्थापक विली किथ केलॉग Kellogg
केलॉग कॉर्नफ्लेक्स कंपनीचा संस्थापक विली किथ केलॉगचा आज ७ एप्रिल जन्मदिन.सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली गरज असते ती नाश्त्याची. आज नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीला दररोज पडणारा प्रश्न. आपल्याकडे अनेक पारंपरिक पदार्थ नाश्त्याला खाल्ले जातात. अगदी शिरा-कांदेपोहे पासून बाहेरुन आलेले ब्रेड जॅम, टोस्ट या आधुनिक पदार्थांचे पर्याय आपल्यासमोर असतात.मात्र हे पारंपरिक पदार्थ मागे पडून…
-
मोटार उद्योगाचा बादशहा हेन्री फोर्ड Henry Ford
आज ७ एप्रिल. चारचाकी गाडी मध्यमवर्गींयांच्या आवाक्यात यावी यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करणारा मोटार उद्योगाचा बादशहा हेन्री फोर्ड Henry Ford यांचा ७ एप्रिल स्मृतिदिवस.३० जुलै १८६३ रोजी अमेरिकन उद्योगपती, फोर्ड गाडय़ांचा निर्माता हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला.हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी…
-
Satish Dhawan – व्यापक दृष्टिकोन असलेला संशोधक सतीश धवन
दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. सतीश धवन Satish Dhawan यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम.…
-
Marie Curie : रसायनशास्त्रात अजोड कामगिरी करणाऱ्या विदुषी मेरी क्युरी
महिला वैज्ञानिकांच्या विश्वामध्ये मेरी क्युरी Marie Curie यांचे नाव घेतल्याशिवाय हे विश्व संपूर्ण होणार नाही. या विज्ञान विदुषीचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी झाला. त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यात जी कामगिरी केली आहे तिला तोड नाही. मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. रेडिओ अॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये…
-
Dr Homi Bhabha – द्रष्टे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी जहांगीर भाभा
काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी…