Captain Anshuman singh : सैन्यदलातील सर्वात महत्वाची व जोखमीची पोस्टींग मानली जाते ती सियाचीनची. सियाचीन ग्लेशियरवर चकमकीपेक्षा येथील आव्हानात्मक वातावरण, कमी तापमान आणि हिमस्खलनाने अनेक जवानांना वीरमरण पत्करावे लागते. सियाचीन ग्लेशियरवर १९ जुलैची पहाट उजाडली ती बंकरमध्ये लागलेल्या आगीने. या आगीत रेजिमेंटचे मेडीकल ऑफीस कॅप्टन अंशुमान सिंह Captain Anshuman singh यांना वीरमरण आले तर तीन जवाना गंभीररित्या जखमी झाले. या जवानांना एअरलिफ्ट करून तातडीने चंदीगड येथे वैद्यकिय उपचारांसाठी पाठविण्यात आले.
बालपण व शिक्षण
कॅप्टन अंशुमन सिंग Captain Anshuman singh हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बर्दिहा दलपत गावचे रहिवासी होते. लष्करातील अनुभवी सुभेदार रवी प्रताप सिंग यांच्या घरात १९९७ ला त्यांचा जन्म झाला.मोठा भाऊ आणि बहिणीसह तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचे शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय मिलिटरी स्कूल छैल या निवासी शाळेत झाले. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये शिकत असताना त्यांचा सशस्त्र दलाकडे कल वाढला आणि त्यांच्या भावी लष्करी जीवनाचा पाया रचला गेला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वैद्यकीय विषयात पदवी मिळवण्यासाठी त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित AFMC (आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेज) येथे प्रवेश घेतला.
सैन्यदलात प्रवेश
पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात भरती होऊन सेवेचा प्रवास सुरू केला. आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही कॉर्प्स शांतता आणि युद्धादरम्यान भारतीय सैन्याला वैद्यकीय सेवा पुरवते. आर्मी मेडिकल कॉर्प्स ऑफिसर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत, त्यांनी आपल्या सहकारी सैनिकांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्याच्या उदात्त कार्यात स्वतःला समर्पित करुन घेतले. दरम्यान १० फेब्रुवारी २०२३ रोजी व्यवसायाने अभियंता असलेल्या श्रीमती सृष्टी सिंह यांच्याशी त्यांचे लग्न झाले.
सियाचीन पोस्टींग
लग्नानंतर पाच महिन्यात जुलै २०२३ दरम्यान, कॅप्टन अंशुमन सिंग यांची पोस्टींग सियाचीन ग्लेशियरवर झाली.१९ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या दुर्गम भागात व अत्यंत प्रतिकुल हवामानात या ठिकाणच्या सैनिकांना काम करावे लागते. तेथे असलेल्या २६ मद्रास व २६ पंजाब बटालियनच्या ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये कॅप्टन अंशुमन सिंग सैनिकांना वैद्यकीय सेवा देत होते.
१८ जुलैची काळरात्र
१९ जुलै २०२३ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास, चंदन पोस्टवर कॅप्टन अंशुमन सिंग Captain Anshuman singh यांच्या बंकरजवळ असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याला अचानक आग लागली. उडालेल्या गोंधळाने कॅप्टन अंशुमनला जाग आली. घटनास्थळी पोहचताच आपले बरेच सैनिक आत अडकले असल्याची जाणिव त्यांना झाली. स्वतःच्या सुरक्षेची काळजी न करता, त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना वाचविण्यासाठी आगीत झेप घेतली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात वाचलेल्यांचा शोध घेण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली. जळत्या बंकरमध्ये तीन वेळा जाऊन त्यांनी सात सैनिकांना वाचवले. अजून अडकलेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी अंशुमन यांनी चौथ्यांदा आगीत झेप घेतली. मात्र दुर्दैवाने आगीत अडकून ते गंभीररित्या भाजले.
दुर्दैवाने, कॅप्टन अंशुमन यांच्या गंभीर जखमांवर उपचार सुरु असतांनाच वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. आपल्या जीवनाची पर्वा न करता लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यातच कॅप्टन अंशुमन सिंग आपल्या सहकाऱ्यांना वाचवतांना शहीद झालेत. कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पश्चात त्यांचे वडील सब रवि प्रताप सिंग (निवृत्त), आई आणि पत्नी श्रीमती सृष्टी सिंग आहेत.
Leave a Reply