दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या मोजक्याच चित्रपटातील अभिनयाने लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिचा आज दि. २६ ऑक्टोबर जन्मदिवस. Actress Asin
जन्म व बालपण
आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीत नाव कमाविणाऱ्या व असीन Actress Asin या नावाने प्रसिध्द असणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म मल्याळी सायरो-मलबार कॅथोलिक परिवारात २६ ऑक्टोबर १९८५ रोजी केरळमधील कोची येथे झाला. तिचे वडील जोसेफ थोट्टूमकल वडील सीबीआय अधिकारी होते, नंतर सीबीआयची नोकरी सोडून त्यांनी व्यवसाय सुरु केला. आई सेलिन थोट्टूमकल व्यवसायाने सर्जन आहेत. शालेय जीवनात असीन हुशार विद्यार्थिंनी होती, तिला दहावीत ९० टक्के गुण मिळाले होते. तिने सेंट टेरेसा कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात कला शाखेची पदवी प्राप्त केली. आसिनचे जन्मनाव मेरी होते. मात्र वडिलांनी तिचे नाव बदलून असिन ठेवले. असीनचा अर्थ शुद्ध आणि निष्कलंक असा होतो.
रुपेरी पडद्यावर पदार्पण
असिनने Asin Thottumkal २००१ मध्ये मल्याळम चित्रपटातून वयाच्या १५ व्या वर्षी ‘नरेंद्रन माकन जयकांत वाका’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशाने असिनला फिल्मी दुनियेची दारे उघडी केली. अभिनयासोबतच असिन प्रशिक्षीत भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. याशिवाय तिला आठ भाषां अस्खलित बोलता येतात. पहिल्या चित्रपटानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री म्हणून नाव कमावले. २००८ मध्ये आलेल्या ‘गजनी’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्यासोबतच या चित्रपटाने असिनला हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख मिळवून दिली.असिनला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर ‘हाऊसफुल 3’, ‘रेडी’, ‘खिलाडी नंबर 786’, ‘बोल बच्चन’ अशा अनेक चित्रपटांद्वारे तिचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु होता.
क्वीन ऑफ कॉलीवूड
बॉलिवूडसोबतच असिनने Asin Thottumkal तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटातही अभिनय करणे सुरु ठेवले. आपल्या अभिनयाने आणि लोकप्रियतेने तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत ‘क्वीन ऑफ कॉलीवूड’ ही उपाधि मिळवली. यशोशिखरावर असतांना अचानक असीनने विवाहाचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये तिने मायक्रोमॅक्स कंपनीतील पार्टनर व्यावसायिक राहुल शर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर अवघ्या एका वर्षात असिनने २०१७ मध्ये अरिन या मुलीला जन्म दिला. लग्न आणि मुलगी झाल्यानंतर असिनने चित्रपटसृष्टीपासून दूर जाणेच पसंत केले.
Leave a Reply